सांजवेळी तू परतून यावे
Kavya Pushpa1
सांजवेळी तू परतून यावे
डोळे पुन्हा भरून यावे. खूप छान विषय आहे हा आज लिपीत प्रेमाचा...मनात आस लागलेली असते आणि तो दिवसभर भेटत नाही तिला ...अनुभव केलेल्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणांची तिला तर आसच लागलेली असते ... मन जागेवर नसतेच... फक्त बेचैन होऊन हुरहुर ते व्याकूळ मध...मग मनाने ती कशातच समरस होत नाही... कशातच तिचे लक्षच लागत नाही ... पुन्हा पुन्हा त्याच त्या क्षणात ... ती विरून जाते आणि त्याच्याच सहवासासाठी आतुरतेने ती आपल्या सख्याची .. प्रेमाची ... येरझारा घालत वाटच पहात रहाते आणि मग मनात मात्र सतत ती म्हणतच राहते..!
" सांजवेळी तू परतून यावेस कसं रे राजा तुला कळत नाही ? माझी काय अवस्था झालीये कसं तुला समजत नाही रे ? " ...
आणि अशाच नाजूक वेळी तिला दुसरं काहीच दिसत नाही विरहात डोळे अश्रूंनी भरले जातात आणि केव्हा डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागतात हे समजतही नाही .....!! 🐦
हायकू :-
😭
राजाऽ ... राणीच्या
होरपळ मनीच्या
कशी मी सांगू ?
हेची नकळे मजला ... जीव माझा गुंतला
रे साजणा कसं रे मी सांगू तुला..?
" आबा "
🤗
🙏
<aaba></aaba>
💚❣️🧡💙🧡❣️💚
Comments please !!
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
Deleteसुंदरच भावरचना आबा 🙏🏼🙏🏼🙏🏼☝️
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखूपच सुंदर रचना सर 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete