Posts

Showing posts from December, 2021

Sensitive Heart...रे हळव्या मना...

Image
Sensitive Heart... रे हळव्या मना... Click and Watch given below link " रे हळव्या मना " एक लघुपट   लघुकथा: ' रे हळव्या मना '... " कशी सुरूवात करू ?... तेच आज मला समजेनासे झालंय ; पण खरं सांगायचं तर तो दिवस होताच तसा अवखळ...सकाळ पासून आकाश गडद भरलेले होते.आज सुर्य नारायण दर्शन देतील...असं क्षणभरही वाटत नव्हते ; पण उद्यापासून नवरात्रची सुरुवात होणार होती..पहिली माळ पडणार होती..अशा पावसाळी वातावरणात देखील बाजारात खूप गर्दी होती...खरेदीसाठी लोकांचं उधाण भरलेलं...सणासुदीची खरेदी करण्यासाठी लोकांनी झुंबड उडालेली..त्याच वातावरणात दिवसभर ढगांची देखील एका मागोमाग धावपळ सुरू असलेली दिसत होती..मधेच घरघर आवाजात मोठ्या संकटाची चाहूल देत वरूणराजा सगळ्यांना समजूतीचा इशारा देण्यात मग्न होता..सायंकाळ झाली होती...संपूर्ण आकाश ढगांनी भरलेले होते...तरीही सुर्य मावळलाय याची जाणीव होत होती..सर्वत्र अंधारलं होत..ती ढगांची घरघर आणि विजेची लखलख मनात एक वेगळीच भिती निर्माण करत होती...अशा वातावरणात मी माझ्या गॅलरीत बसून कधी आभाळात तर कधी आजूबाजूच्या गोष्टी न्यहाळत निरिक्षण करत बसलेलो..मना...