तोच जादूगार
He is a magician: तोच जादूगार 'संत नामदेव' महाराज' हे तर लहानपणा पासूनच साक्षात 'विठ्ठलाचे' 'पांडुरंगाचे' परमभक्त होते. 'भोज' म्हणून त्यांनी दाखवलेला नैवेद्य खायला स्वतः विठ्ठला ला तिकडे यावे लागायचे. त्याशिवाय ते जेवायचे नाहीत. त्यांनीच तर असंख्य अभंग आणि भजने लिहिलेली होती. ते 'विठ्ठला' चे 'पांडूरंगा' चे एवढं भक्त होते की मनापासून तल्लीन होऊन एकरूप होऊन पांडुरंगाच्या लिलयांचे प्रेमाने कीर्तन करत..साक्षात मूर्तिरूपाने उभा असलेला 'पांडुरंग' सुद्धा तालावर मान डोलावत नाचत किर्तनाची लज्जत वाढवत असत; एकदा एक दिवस त्यांच्या कीर्तनाचा हा वेगळाच परमार्थाचा आनंद घ्यायला निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई तिकडे गेले. मन लावून कीर्तन ऐकले. कीर्तन झाल्या नंतर ते नामदेवांना भेटायला गेले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान सर्वांनी त्यांना एकमेकांनी करत नमस्कार केला. त्यांनी मात्र परतून नमस्कार केलाच नाही.. विठ्ठलाशी त्यांची जी जवळीक झालेली होती, त्यामुळे त्यांच्या मनात काही प्रमाणात अहंकारच उत्पन्न झाला होता. आपणच एकमेव विठ्...