आपले सहर्ष स्वागत करीत आहे
Kavya Pushpa1
काव्यपुष्प-कवी कविता
नमस्कार 🙏
मी "आबा " (slaher)
आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
सर्व मित्र मैत्रीणीना आवर्जून सांगण्यास आनंद होत आहे ...
लिपीतील काही मित्र मैत्रिणी एकत्र येऊन
"काव्यपुष्प - कवी" या डिजिटल मंचाची स्थापना करण्यात आली आहे..याचा उद्देश आणि कार्य याचा उल्लेख मी पुढे करीत आहे ... !
सगळेच कवी कवयत्री लेखक ... प्रतिलीपी या साहित्यिक app मधे खूप काही लिहित असतात. दिवसांत कितीतरी वेळ आपल्या साहित्यिक जिवनाचा खरा तिकडं आनंद घेत आहेत... पाहून खूप छान वाटते.. पण मध्यंतरीच्या काळात लिपी संयोजकांनी एक लेख प्रकाशित केलेला वाचनात आलेलं होतं .. खूपच छान मनोगत त्यांनी मांडलेलं दिसून आले होतं .. त्यांत त्यांनी स्थापने पासून सविस्तर वृत्तांत सांगितला होता ..खूपच छान मनाला भावलेला ..परंतू त्यांनी त्यात काही न लपवता एक छानशी गोष्ट सांगितली आहे .. ती म्हणजे अमेरिकेतून या app साठी काही कोटींचा अनुदानित निधी प्रोत्साहन म्हणून उपलब्ध झालेलं नमुद केलं होतं. मोठ्या प्रमाणात अनुदानित निधी मिळाला .ही खूपच छान गोष्ट आहे.
त्यामुळे मनात एक चांगला विचार आला... लिपीत कितीतरी नवोदित आणि दिग्गज असे साहित्यिक आहेत जे लिपीत सदोदीत लिहीत आहेत खूप आनंदही मिळतो ...अनेकजण तोंडभरून कौतुक करतात .. भ्रामक चाकलेट आईस्क्रीम स्वादिष्ट डिश समीक्षेत मिळतात आणि व्वाह व्वाऽ होत असते ... !!
इतकं करूनही त्या पलीकडे जाऊन ... खिशात काहीच पडत नाही ... काही तरी अर्थीक उत्पन्न त्यातून निर्माण व्हायला हवे .. असं मनात आलं आणि त्या दृष्टीने विचार करून काही जणांशी तशी चर्चा केली. माझे विचार सांगितले की आज तर हे डिजिटल युग आहे. आपल्या पैकी बहुतेकांच्या हातात किमान चार पाच तास मोबाईल फोन असतो आणि तोही लिपीत असतो.. !!
मग दुसरं काय लागतंय ? ....
मनाची तयारी आणि जे लिपीत करतो तेच आपण आपल्या स्वत:च्या डिजिटल पेजवर काम करून प्रकाशित करणे आवश्यक आहे त्यातून प्रत्येक लेखक कवी कवयित्री यांना स्वतंत्र असे व्यक्तिगत उत्पन्न blog वरील advertising च्या माध्यमातून मिळू शकते .. आणि कित्येक जण त्याचा चांगला उपयोग करून घेत आहेत.
आज लिपीत अनेक जण आहेत ... म्हणून लिपी चोवीस तास चालते ... तुम्ही आम्ही एकटेच असेल तर तेवढं चालणार नाही .. पण अनेकजण एकत्र येऊन काम केले तर "काव्यपुष्प - कवी " यावर खूप वर्दळ होईल आणि तिथे असलेल्या आपल्या साहित्यात जाहिराती चे उत्पन्न आपण घेऊ शकतो .. !
त्यात प्रथम साचेबद्ध ई-मेल address तयार करून एकाच बॅनर खाली एकाच प्रकारचे नाव घेऊन जसे उदाहरणार्थ : (काव्यपुष्प - कवी.गणेश दळवी ) अशा प्रकारे आपण या ठीकाणी स्वत:ची ओळख मांडणे आहे. प्रत्येकाच्या नावाने ads registration केले जाईल .. प्रत्येकास काही दिवसांत ज्याचे त्याचे उत्पन्न स्वतंत्र खात्यात गुगल कडून जमा होत राहिलं. त्यामुळे निःशंक पुणे काम होत राहिलं !!
संपूर्ण सेटअप करण्यासाठी आपल्या मनाची तयारी करून एक एक स्टेप पुढे जाता येणार आहे..!!
सुरवातीला मोफत सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून कार्य करू नंतर जसे उत्पन्न मिळेल तसे upgrade करता येईल ...!!
आजच्या काळात परंपरागत पद्धतीने जे काम करतो त्यास हि डिजिटल जोड लाभली तर खूप काही शिकायला मिळते आणि उत्पन्न ही मिळते ..जग वळत आहे आपणही त्याबरोबर वळून संधीचा लाभ घेऊ...आज सुरुवात केली की काही दिवसांत रसाळ मधुर फळे नक्कीच मिळतील .. !
तेव्हा ... मला ही आशा आहे की ... माझे विचार आणि योजना आपणास आवडली असेल आपल्या बरोबर आपले मैत्रीण यांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे ... !
काही शंका असतील तर
श्री गणेश दळवी
श्री मोहनजी सोमलकर सर
सौ. उर्मिला जी परूळेकर
तसेच सगळ्यांची लाडकी
आयडियाची ... कल्पना "शब्दवेडी"
आणि स्वत: मी "आबा" Slaher आपणास व्यक्तिगत सहकार्य करण्यास तयार आहोत
एक टारगेट आहे
दिवाळी अंक म्हणून प्रकाशन करण्यात यावे अशी आशा आहे ... 🙏
धन्यवाद ... !!
आपला अभिप्राय आपला सहभाग मौल्यवान ठरणार आहे .. सर्वच मित्र मैत्रिणींनी
नि:शंक पण सहभागी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना ..!
Group मधे join होण्यासाठी
Group invetation link :-
Only Share it with people you really trust
🙏 "आबा" ... धन्यवाद ..!
धन्यवाद सर तुम्हांला 🙏🙏 आणि खूप खूप शुभेच्छा या नवीन उपक्रमाला 💐💐🍫🍫 👏👏👏 रंजू
ReplyDeleteखूपच छान उपक्रम आहे आम्हाला खूपच आवडला आहे.
ReplyDeleteधन्ययाद आबा
ReplyDeleteखरचं खूपचं छान उपक्रम आहे