Storm - And He Was Stunned
Storm - And He Was Stunned
आणि तो स्तब्ध झाला.
A Narrative:
वाटलही नव्हतं...काय सांगू?..
एक दिवस तो कल्पनेच्या ही पलीकडे जाऊन..
आपल्याच अहंकारात मदमस्त होऊन आपल्याच धुंदीत
कोणाचीच पर्वा न करता अवचित येऊन...
सिमेंटच्या जंगलात गरीब श्रीमंत उच्च शिक्षित अशिक्षीत
लहान मोठा कोणासही भेदभाव न करता...
नाही कोणास पाहता..एकाच अधिपत्या खाली..
त्याच्या संतापाने चिडलेल्या मनस्थितीच्या आदेशा नुसार
यानेच क्षणाचाही विलंब न लावता..एखाद्या रोबोटिक सारखं..
आपलं डोकंच न वापरता फक्त दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे एवढेच त्यास माहित असलेल्या सारखं वागून...
प्रचंड शक्तीशाली असल्याचं प्रदर्शन करत
शिवाय उनाड उनाडक्या करत कोणास किंचितही दया ही न दाखवता रौद्ररूप धारण करून अनेक शस्त्रात्रे आयुधे आपल्याच सहत्र हाती घेऊन सर्वनाश करत काही क्षणच तो उधळलेला ...आणि
काय झालं कुणास ठाऊक ?....पण पुढे जाऊन तो थबकला..
मागे वळून पाहिलं तर...?
आक्रोश ऐकलेस सर्वत्र जमीनदोस्त होऊन विद्धंस झालेलं दिसले...
अनेक जीवाचे मृतदेहाचे खचच खच पाहिले...
पाहुनी ते...अधिपती खुश झाले; पण ....
पण हा बिचारा आपल्या ओंजळीत तोंड झाकत
अधिपतीस म्हणाला ...तुम्ही असणार अधिपती;
पण पुण्यांदा असंल हे कृत्य करायला या पवनाला सांगू नका !....
अहोऽ.. मीच तर त्यांचे जीवन, सखा आहे..
क्षणभरही हीच प्रेमाची सगळीच जिव्हाळ्याची
माझ्या शिवाय राहूच शकणार नाहीत...
मीच वारा मीच पवन उनाड सुनामी...
आणि त्यानेच स्तब्ध होऊन शरमिंदा होऊन
श्रद्धांजली वाहिली
🙏
🙏
Slaher
<aaba>©aaaba
Copyright© Protected


मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखुप छान लिहीलय आबा ����
ReplyDelete