आयुष्याचं गणित
आयुष्यच गणित
What have you gained and what have you lost in life?
आयुष्याचं गणित
काय मिळवलं अन काय गमावलं ?
हे आयुष्यच गणित मांडून .. मी काय साधणार ?
विषय खूपच छान पडला आहे कविता
तसं पाहिलं तर
उत्तर अगदी साधं सोपं आहे...!!
पण .. माहित आहे का तुम्हाला ...?
कसं आहे... बघायला गेलं तर
आयुष्य हेचं एक गणित आहे.
रोज नवा विषय नवे नवे अंक ते शब्दांचे
बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ही
आपल्याच मनातले लहान किंवा मोठे
आकडे समस्यांचे .. तरंगत भेडसावतात
आपल्याच जवळच्या आणि प्रेमाच्या माणसांचे
उत्तर असते सोपंच ..पण उगाचच काहीतरी
शंका कुशंका यातच मती गुंग
कितीही नाही म्हटलं तरी होतंच नाऽ मन सुन्न
विनाकारण नको तसंच तेच ते दंग
तसं पाहिलं तर उत्तर असतं
अगदी साधं आणि सोपं...!!
पण मग हे गणित .. असलं आयुष्याचं
उगाचच मांडून .. मी काय करायचं ?
असून देत .. जे असेल ते असेल
पण खरं सांगू का ?
भुमिती च्या वर्तुळात .. एकाच केंद्रा भोवती
एकच त्रिज्या .. पुन्हा पुन्हा फिरताच
वर्तुळ गडद होत जाते .. तसेच या समस्याचे
एकाच विषयावर पुन्हा पुन्हा तेच
आणि समस्यांनाच ठेच
केंद्री बिंदू बदला .. विषय तिथेच संपला
नवा केंद्रबिंदू नवे वतृळ
आणि मग .. बाकी काय रहाणार ?
त्याला मी तरी काय करणार ?
आयुष्याचं तेच गणित
हे आयुष्यच गणित मांडून .. मी काय साधणार ?
विषय खूपच छान पडला आहे कविता
तसं पाहिलं तर
उत्तर अगदी साधं सोपं आहे...!!
पण .. माहित आहे का तुम्हाला ...?
कसं आहे... बघायला गेलं तर
आयुष्य हेचं एक गणित आहे.
रोज नवा विषय नवे नवे अंक ते शब्दांचे
बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ही
आपल्याच मनातले लहान किंवा मोठे
आकडे समस्यांचे .. तरंगत भेडसावतात
आपल्याच जवळच्या आणि प्रेमाच्या माणसांचे
उत्तर असते सोपंच ..पण उगाचच काहीतरी
शंका कुशंका यातच मती गुंग
कितीही नाही म्हटलं तरी होतंच नाऽ मन सुन्न
विनाकारण नको तसंच तेच ते दंग
तसं पाहिलं तर उत्तर असतं
अगदी साधं आणि सोपं...!!
पण मग हे गणित .. असलं आयुष्याचं
उगाचच मांडून .. मी काय करायचं ?
असून देत .. जे असेल ते असेल
पण खरं सांगू का ?
भुमिती च्या वर्तुळात .. एकाच केंद्रा भोवती
एकच त्रिज्या .. पुन्हा पुन्हा फिरताच
वर्तुळ गडद होत जाते .. तसेच या समस्याचे
एकाच विषयावर पुन्हा पुन्हा तेच
आणि समस्यांनाच ठेच
केंद्री बिंदू बदला .. विषय तिथेच संपला
नवा केंद्रबिंदू नवे वतृळ
आणि मग .. बाकी काय रहाणार ?
त्याला मी तरी काय करणार ?
आयुष्याचं तेच गणित
उगाचच पुन्हा पुन्हा मांडून..!
आबा
©

अतिशय सुंदर आयुष्याचं गणित मांडले आहे👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर लिहिलंय सर
ReplyDeleteखरंच छान सांगितलंत आबा, केंद्रबिंदू बदलणार गणित चालूच रहाणार
ReplyDeleteचिंता सर्व विसरून आयुष्य हसत जगावे 👌👌🙏🏼🙏🏼
आबा अतिशय सुंदर लिहिलय, सुप्रभात, घ्या चहा
ReplyDeleteमस्त लिहिलंय आबा...खरंय चिंता ह्या चिंता वाढवतात.हसत जगावे!✍️👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर..👌👌👍शुभ सकाळ 🙏
ReplyDeleteKhup chan 👌 apratim sandesh mast lihil 👌👌👌👌😊😊
ReplyDeleteसुंदर रचना आबा...बरोबर आहे... स्वस्थ रहावे आणि मस्त जगावे....नवीन काहीतरी शिकत राहावे....✍️👌👍🍫🍫🍫🍫🍫🧁🧁🧁🌹
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌
ReplyDelete