Sensitive Heart...रे हळव्या मना...

Sensitive Heart...रे हळव्या मना...


Click and Watch given below link


 लघुकथा:

' रे हळव्या मना '...

"कशी सुरूवात करू?...तेच आज मला समजेनासे झालंय; पण खरं सांगायचं तर तो दिवस होताच तसा अवखळ...सकाळ पासून आकाश गडद भरलेले होते.आज सुर्य नारायण दर्शन देतील...असं क्षणभरही वाटत नव्हते; पण उद्यापासून नवरात्रची सुरुवात होणार होती..पहिली माळ पडणार होती..अशा पावसाळी वातावरणात देखील बाजारात खूप गर्दी होती...खरेदीसाठी लोकांचं उधाण भरलेलं...सणासुदीची खरेदी करण्यासाठी लोकांनी झुंबड उडालेली..त्याच वातावरणात दिवसभर ढगांची देखील एका मागोमाग धावपळ सुरू असलेली दिसत होती..मधेच घरघर आवाजात मोठ्या संकटाची चाहूल देत वरूणराजा सगळ्यांना समजूतीचा इशारा देण्यात मग्न होता..सायंकाळ झाली होती...संपूर्ण आकाश ढगांनी भरलेले होते...तरीही सुर्य मावळलाय याची जाणीव होत होती..सर्वत्र अंधारलं होत..ती ढगांची घरघर आणि विजेची लखलख मनात एक वेगळीच भिती निर्माण करत होती...अशा वातावरणात मी माझ्या गॅलरीत बसून कधी आभाळात तर कधी आजूबाजूच्या गोष्टी न्यहाळत निरिक्षण करत बसलेलो..मनात फक्त एकच विचार घुटमळत होता...आजचा पाऊस भयंकर असणार आहे...कारणही तसेच होते...आकाशात दिसणारे आक्राळविक्राळ दृश्य पाहून आणि भयानक आवाज ऐकून कोणालाही भिती वाटेल असेच झालेलं होत..

सकाळपासून घराबाहेर पडलेले सर्वच...जोरदार मुसळधार पाऊस पडणार...ह्या भितीनं आपल्या घराकडे परतत होते.प्रत्येकाची घरची ओढ त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होती..खरंतर मीही...सकाळीच बाहेर पडलेली आमची मुलं लवकर घरी यावीत यासाठी मनोमन प्रार्थना करत होतो.. सगळं वातावरण अगदी भयानक झालेलं होतं..त्या आक्राळविक्राळ आवाजाने छातीत चांगलीच धडधड वाढली होती..सतत आत बाहेर करत हवालदिल होऊन हिला विचारत होतो...अजून कशी नाही आलीत ग ही पोरं?...समजत नाही का?..अशा वेळी सगळ टाकून पटकन घरी यायचं सोडून दुसऱ्याला काळजी करायला लावतात... हल्लीच्या पोरांना काहीच कसं समजत नाही?...तसं तिने समजूतिच्या सुरात म्हणाली...'येतील होऽ...नका जास्त काळजी करू..बसा शांत चित्ताने...आलं टाकून चहा देते..थ़ोडावेळ थांबा येतीलच'...आणि मन शांत केलं..तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि एकामागोमाग दोघंही वर आले..तसं ती म्हणाली...'बघा मी म्हणलं होते नाऽ...दोघंही आलीय'..आणि पोरांना म्हणाली 'अरे..उगाच काळजी करत बसले होते..अजून कशी आली नाही ही पोरं'...पोरं आली म्हणताच...जिवाला शांतता मिळाली आणि माझं लक्ष पुन्हा बाहेरच्या वर्दळीकडे वळले; पण आकाशात वीजा आणि ढगांच्या घरघरीनं वातावरण आणखीनच भयानक होत चाललं होतं..केंव्हाही पावसाला सुरुवात होईल असं वाटत होतं...

आणि क्षणात झालंही तसंच.प्रचंड वीजांचा लखलखाट झाला ढगांवर ढग आदळत...मोठ्या भयानक आवाजात गडगडाट होऊ लागला...त्या आवाजाने सगळ्यांच्या मनात भिती निर्माण झाली. आणि क्षणातच मुसळधार पावसाने आक्राळविक्राळ रूप धारण करून जोरदार कोसळायला सुरुवात केली...ते पावसाचं भयानक रूप पाहून कधीच नव्हे इतकी मनात धडकीच भरली; पण तेवढ्यात काय झालं कोणास ठाऊक?...दोन चिमुकली पाखरं अगदी छोटी.. एकाच ओंजळीत दोघं मावतील ईतकी छोटी....घाबरून जीव मुठीत घेऊन पटकन माझ्या छातीवर बिलगली..खूप घाबरलेली होती..अशी अचानक येऊन बिलगल्यामुळे...मला तर काहीच सुचेना...आधी तर घाबरलोच; पण क्षणात मला लक्षात आलं..दोघेही खूप घाबरलेत...धीर देण्यासाठी म्हणून हळूवारपणे स्पर्ष करणार..तेव्हाच दोघंही एकमेकांना समजेल अशा भाषेत चिवचिवाट करत पटकन बाजूच्या कठड्यावर जाऊन पंख फडकवत स्वैर भैर होऊन गेलेले..मी ओळखलं...तिच ही पाखरं होती..जी दररोज आमच्या बाल्कनीत येऊन आपल्या मंजूळ आवाजात चिवचिवाट करत खेळत बागडत असतं...समोरच्या झाडावर एका फांदीवर त्यांच छान छोटंसं घरटं त्यांनी बांधलेलं होतं..बाल्कनीतून पुन्हा घरट्यात..येजा करत बागडताना दिसायचे...नुकताच तीन चार दिवसांपूर्वी त्यांनी एका पिल्लाला जन्म दिला होता..आणि ते पिल्लू त्या घरट्यात आपल्या आईच्या येण्याची वाट पहात रहायचं...आई चोचीत दाणा घेऊन त्या पिल्लाला प्रेमानं भरवत राहायची;

पण आज मात्र पावसानं चांगलीच खळबळ उडवून टाकली होती..ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात आणखीनच जोर धरला..त्या रौद्ररूप धारण केलेल्या पावसानं धडधाकट मनुष्य घबरलेला होता तिथे या चिमुकल्या जिवाचं काय झालं असेल? हे कल्पनाच न केलेली बरी..असंच काहीसं झालं होतं..खूप घाबरली होती...आपल्या घरट्यात पिल्ला जवळ जाण्यासाठी जागेवरच दोघांची फडफड चालू होती..आपल्या पिल्लाला वाचवायची..मायेच्या कुशीत घेऊन पंखाखाली घेऊन...'बाळा घाबरू नकोस रेऽ..मी आहे नाऽ' सांगून...आधार द्यायचा होता..कधी घरट्यात जाऊन त्याला पंखाखाली घेतेय अस त्यांना झालेल दिसत होतं; पण त्या मुसळधार पावसात एक फुट देखील ते उडून जाऊ शकत नव्हते..पंख निकामी होतील आणि आणखीन एक संकट उभे राहिल असे झालं होतं..त्यांची होणारी तडफड तगमग पाहून माझ्याही मनाची फडफड होत होती..अस्वस्थ होऊन गेलो.कसं ह्या चिमुकल्या मुक्या पक्षांना मी सावरू?..कसं यांचं सांत्वन करू?..काहीच समजेना..अशा परिस्थितीत काही क्षण आमची नजरानजर झाली...डोळ्यात भिंती दिसत होती...आशाळभूत नजरेतून...ते दोघे मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते...ते पाहून...त्यांना भुक लागली असेल..असं समजून पटकन किचनमधे गेलो आणि एक घास पांढरा भात वाटीत घेऊन आलो...त्यांच्या पुढे ठेवलं; पण काहीच उपयोग झाला नाही..क्षणभरही त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही...उलट त्या चिमुकल्या जिवाची होणारी तगमग आणखीनच वाढलेली दिसू लागली..पावसानं आणखी जोरदार मुसंडी मारलेली ढगांचा गडगडाट विजांचा प्रचंड लखलखाट समोरचं काहीच दिसत नव्हतं..रस्ता तर नदी सारखा दुतर्फा कमरे एवढ्या पाण्यांत बुडलेला..ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरली जात होती...मीही खुप घाबरलो होतो..त्या घरट्याकडे दुरून माझं लक्ष केंद्रित करून नेमकं काय दिसतंय? त्याचा अंदाज घेत राहिलो; पण सर्व निरर्थक होतं..काहीच दिसत नव्हतं..फक्त जवळच्या विजेच्या खांबावरचा दिवा...पावसाच्या दाट रेषात अंधूक प्रकाशात लुकलुकताना मात्र दिसत होता...इतक्या वेळात हिने चार पाच वेळा आवाज देऊन 'आहोऽ...बास झालं आता...खूप उशीर झालाय..पाउस काही केल्या थांबणार नाहीये'..तसं तिला म्हणालो, 'अंग बघनाऽ ह्या चिमुकल्या जिवाची घालमेल..होरपळ..जिवाच्या आकांताने त्यांच ते केविलवाणं रडणं मला अस्वस्थ करून राहिलय... आता जो पर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही...तुम्ही जाऊन झोपा मी येतोच'..सांगून तिची बोळवण केली..आणि ती काहीतरी पुटपुटत आत निघून गेली..


रात्रीचा एक वाजला होता.पाऊसाची चिन्हे आणखीनच दाट झालेली..ढगाचा गडगडाट विजांचा लखलखाट स्वैराचारानं उधाण मांडत होता...आशेनं माझ्याकडे पहात सारखं काढड्यावर येऊन जिवाच्या आकांताने दोन्ही पाखरं ओरडत होती...ते ह्रृदय पिळवटून टाकणारं दृश्य होते..वाटलं होतं असंच दोघांना ओंजळीत घेऊन तडक बाहेर पडावं आणि आपल्या हाताने त्यांच्या घरट्यात नेऊन सोडावं; पण सगळं व्यर्थ...वयोमाना नुसार माझी अशी अवस्था, तब्बेत ठीक नाही...हे काम करू शकत नव्हतो...माझ्याही मनाची फडफड होत राहिली...कधी नव्हे इतका अस्वस्थ होऊन गेलेलो काय करावं ह्या चिमुकल्या जिवासाठी?..काहीच उमजत नव्हतं...


खूप गारवा वाढला होता...तसाच हिरमुसला होउन तिथून आत आलो..तेंव्हाच अचानक माझ्या मनात विचार आला...संकट समयी तात्काळ धाऊन येणारे एकमेव 'आग्नीशामक दल'...अशा वेळी आग्नीशामक दलास कळविले तर?...ते नक्कीच येतील आणि आपल्याला मदत करतील...क्षणभर खूप हायस वाटलं.. आणि लागलीच फोन घेऊन बाल्कनीत पुन्हा आलो.. फोन लावला तसंं लागलीच... "Hello....Do you want any help?.... what we can do for you.? Please.! "


हळूहळू उजडायला लागलं...दुतर्फा वाहाणारं तुडुंब पाणी संथ गतीने वाहू लागलेल...एकाएकी पवसाचा जोर कमी होउन राहीलाय जाणवू लागलं..बघता बघता ढगांची गर्दी कमी झाली आणि आकाश निरभ्र दिसायला लागलं...अचानकच...धुव्वाधार पडणारा पाऊस पडायचा थांबला...आणि क्षणात सगळंच शांत झालं...घड्याळात पाहिलं साडेसहा वाजले होते...वळून पाहिलं तर काय आश्चर्य ?....पाऊस थांबलाय पाहून....क्षणातच ते दोघं भुर्रकन उडून आपल्या घरट्याकडे जाताना मला दिसली....काही समजण्याच्या आधीच घरट्यात आपल्या पिल्लांची खुशाली बघण्यात मग्न झालेले दिसत होते...पंखांची फडफड करत दोघेही पिल्लूचं कौतुक करण्यात दंग होऊन गेलेले..मायेचा वर्षाव करत चिवचिवाट करत आनंद साजरा करण्यात दंग होऊन गेलेले..अश्रूंचा पूर त्यावर ओतत असलेलं मला दुरूनही दिसत होतं..त्यांचा तो आनंद सोहळा मला अस्पष्ट दिसत होता..डोळे अश्रूंनी डबडलेले होते..ते द्रृष्य पाहून खूप अनावर झालेलं...माझं हळवं मन...मी नाही आवरू शकलो....खूऽप खूप रडलो..


अशा आपुलकीच्या सुरांत विचारणा झाली..खूप छान वाटलं..तसं मी त्या सज्जन गृहस्थाला म्हणालो..'अहो ह्या मुसळधार पावसात एक खूप मोठं संकट आमच्याकडे निर्माण झालंय...काय करावं? मला तर काहीच सुचत नाहीये'...आणि...संकटात सापडलेल्या निरागस पाखरांचा सगळा वृत्तांत सांगितला..वटलं..सगळं ऐकून ते म्हणतील..'काही काळजी करू नका...आम्ही ताबडतोब तिकडं येतोय..फक्त तुमचा पत्ता लगेच कळवा'...पण झाले भलतेच...तो गृहस्थ चिडलेल्या आवाजात..'.ऐ पागल!....फोन ठेव..दुसरा कोणी सापडला नाही का तुला.?'..तसं विनविणीच्या सुरात म्हणालो...'अहो साहेब!...असं करू नका होऽ...बिचाऱ्या पाखरांवर दया करा'..तसं तो पुन्हा म्हणाला 'ऐ पागल!...एवढ्या मोठ्या शहरात लाखो घरटी आहेत...सगळ्यांची अशी केअर करत बसलो तर वर्ष देखील पुरणार नाही..आणि तुझी कंप्लेंट जरी मी घेतली...तरीही तुझा नंबर पंधरा वीस तास लागणार नाहीये...तोपर्यंत सगळं काही शांत झालं असेल..जाऽ..जाऊन शांत झोप'..ते ऐकून खूप संताप झाला.मनातून खूप शिव्या दिल्या..शेवटचा मार्ग होता; पण आता तोही संपला होता..काय करावं काहीच सुचत नव्हतं..ती जोडी मात्र क्षणभरही स्थिर नव्हती..पावसाचा जोर आणखीनच वाढलेला. ढगांचा गडगडाट विजांचा लखलखाट मन अस्वस्थ करतच होते..रात्रीचा तिसरा प्रहर संपून ब्रम्हकाळ सुरू झालेला..पहाटेचा सुमार असुनही पहाटेची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती..भयाण वास्तव समोर दिसत होतं..पाखरांची केविलवाणी अवस्था त्यांची होणारी तगमग मला बघवत नव्हती..सतत खिडकीतून डोकावून पहात राहिलो...आशाळभूत नजरेने मदतीची अपेक्षा करणार्या त्या चिमुकल्या पाखरांसाठी आपण काहीच करू शकत नाही...याचीच मनाला सल लागून राहिली होती..आयुष्यात कधीच नव्हे इतकी बेचैनी

मी अनुभव करत होतो... आंधाराच सावट निखळत चाललेलं होतं.. इतका की संपूर्ण रात्रभर जेवढा पाऊस पडला...त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने माझे अश्रू सततधार वाहात होते...खिडकीतून बाहेर त्या घरट्यात तो आनंद सोहळा बघत होतो; पण घळाघळा वाहाणारे अश्रू मात्र मी थोपवू शकत नव्हतो."...

'रे हळव्या मना'... लघुकथा

लघुकथा संग्रह कथा © : सतीश आहेर...


Comments

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं