Lotus Petals Collapse : मिटतात कमल दल

Lotus Petals Collapse : मिटतात कमल दल



Lotus Petals Collapse : मिटतात कमल दल

You are the first love I will never forget.
You are such a feeling that will never fade away

विषय कसे मिळतात बघा ... 

तूच आहेस ते पहिले प्रेम  ...ते मी कधीच विसरणार नाही.

 तू तर अशी भावना आहेस  ती कधीही  मिटणारच नाही

खूप छानच विषय दिलाय विषय वाचला 

आणि पटकन डोळेच ..!

तुझ्या आठवणीत अजुनही मला
ते दिवस आठवतात ग
आणि नकळत डोळे पाणावतात
करतो मी कबुल ... झालाय तुझ्यावर अन्याय
खरंतर मीच आहे तुझा खरा गन्हेगार 
तुझ्या त्यागाचा विषय आजही मनात डसतोय
म्हणूनच तुझ्या तगमगीचा काही अंश  
रोजच मीही अनुभव करतोय
अगंऽ... तोच परमेश्वर ...‌ तगमग तुझी तोलतोय
तेवढीच यातना .. मलाही तो देतोय 
आणि आज तुझ्या आपोरक्ष 
हृदयात जपलेल्या या जीवाला ही तो देतोय
कमलदलाऽ... तुझा तोच हसरा चेहरा
खुदकन गाली हसताना खळी पडून
अजूनही मला रंग बदलताना दिसतोय 
म्हणूनच गऽ.... !!
तू तर फक्त आणि फक्त

एक अद्वितीय भावना आहेस

अद्वितीय भावना आहेस
विचार ग माझ्या जीवाला ... खरंच
तोही तुझ्या त्यागाचा 
आता एक अंशच आहे ग
एक अंशच आहे ग

आबा
Copyright Protected


प्रेमाच्या नात्याला
प्रयत्नांची गरजच नसते.
ते तर फक्त निस्वार्थच असते
प्रेमाच्या नत्यात ... अहोऽ प्रेमाच्या नत्यात
आपोआपच होत असते...!
कोण म्हणतंय ?
नात्याला प्रयत्नांची गरज असते ?
अहोऽ...प्रेमाची परिभाषा हीच तर
खूप वेगळीच असते होऽ वेगळीच असते
त्यात स्वार्थ सापडत नाही तर
फक्त आणि फक्त .... त्यात
प्रेमच सापडते होऽ प्रेमच सापडते
जीवापाड जपलेल्या नात्याला...तोऽ
जीवनाचे खरं सार्थक करणारा
तोच आनंद देण्याचा एक अनुभव असते
खूप छान असते होऽ ...खूप छान असते
त्याच नात्याला .. हेच तर खूप गरजेचं असते
प्रेमात पडतो .. त्याचं खरं मर्म
त्यालाच तर कळते होऽ
ते तर सार्या विश्र्वाचं भानच हरपते
आणि तेव्हाच दोन्ही एकरूप होत असते
तोच तो अनुभव जीवनाचा खरा आनंद
पुर्णत्वास पोहचवून देहभान विसरते
आणि निस्वार्थ प्रेमाला नात्याच्या बंधनात
घट्ट मिठीत सामावून घेते
अगदी घट्ट सामावून घेते
तेव्हाच ...‌ते सारं
अगदी पुर्ण होत असते
आणि जीवाच्या मिठीत 
सारं जीवन एकरूप होत असते
एकरूपच होत असते

जीवाच्या मिठीत 
सारं जीवनच एकरूप होते
आणि
Early in the morning Very Good Morning 

होते

आबा
Copyright Protected

lotus-petals-collapse

Comments

  1. खुप सुंदर रचना...👏👏👏💐🍫
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं