तोच जादूगार

 He is a magician: तोच जादूगार     



'संत नामदेव' महाराज'

हे तर लहानपणा पासूनच साक्षात 'विठ्ठलाचे' 'पांडुरंगाचे' परमभक्त होते. 'भोज' म्हणून त्यांनी दाखवलेला नैवेद्य खायला स्वतः विठ्ठला ला तिकडे यावे लागायचे. त्याशिवाय ते जेवायचे नाहीत. त्यांनीच तर असंख्य अभंग आणि भजने लिहिलेली होती. ते 'विठ्ठला' चे 'पांडूरंगा' चे एवढं भक्त होते की मनापासून तल्लीन होऊन एकरूप होऊन पांडुरंगाच्या लिलयांचे प्रेमाने कीर्तन करत..साक्षात मूर्तिरूपाने उभा असलेला 'पांडुरंग' सुद्धा तालावर मान डोलावत नाचत किर्तनाची लज्जत वाढवत असत;

एकदा एक दिवस त्यांच्या कीर्तनाचा हा वेगळाच परमार्थाचा आनंद घ्यायला निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई तिकडे गेले. मन लावून कीर्तन ऐकले. कीर्तन झाल्या नंतर ते नामदेवांना भेटायला गेले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान सर्वांनी त्यांना एकमेकांनी करत नमस्कार केला. त्यांनी मात्र परतून नमस्कार केलाच नाही.. विठ्ठलाशी त्यांची जी जवळीक झालेली होती, त्यामुळे त्यांच्या मनात काही प्रमाणात अहंकारच उत्पन्न झाला होता. आपणच एकमेव विठ्ठलाचे सर्वात मोठे भक्त आहोत...तेव्हा दुसऱ्या संतांनी आपला आदर करावाच; पण आपण दुसऱ्या संतांना आदर देण्याची काय गरजच नाही.. अशीच काहीशी त्यांच्या मनात भावना निर्माण झाली होती. मुक्ताबाईने हे लगेच चाणाक्ष बुद्धीने ओळखले आणि त्यांना नमस्कार केलाच नाही. मुक्ताई म्हणाल्या: "नामदेवांचं ज्ञान अर्धवट आहे. त्यांना नमस्कार करण्याची काहीच गरजच नाही; हे ऐकुन तिचे भाऊ तर चमकलेच;  पण ते ऐकून 'संत नामदेव' सुद्धा व्यथित झाले. त्यांच्यात वाद झाला. 'संत गोरा कुंभार' या सर्वांना वरिष्ठ होते. सर्वजण निवाडा करायला त्यांच्याकडे गेले.संत गोरा कुंभारांनी त्या सर्वांच्या डोक्याला हात लावून मडके तपासल्यासारखे तपासले. आणि वेगळ्याच नजरेन आकाशाकडे पहात कुंभाराच्या परिभाषेत म्हणाले :"मुक्ताई म्हणते तेच खरंय, 'नामदेवांचं' मडकं कच्चंच आहे होऽ कच्चच आहे..."
त्यावर 'संत नामदेव' दुःखी होऊन आपल्या 'पाडूरंगा' जवळ गेले. तेव्हा 'पाडूरंग' म्हणाले; "ते लोक म्हणतायत ना ऽ..तेच खरं आहे. तू मला माझ्याच .. फक्त; 'पांडूरंग' ह्या एकाच रूपात जाणतोस आणि पूजतोस. तुला खरंतर एका सक्षम गुरुची खूप गरज आहे. 'श्री ज्ञानेश्वरां' कडे तू जा तेच तुला परमार्थाचा खरा मार्ग दाखवतील"
त्यामुळे 'संत नामदेव; :ज्ञानेश्वर माऊलींकडे गेले. त्यांनी 'नामदेवाला'  'विसोबा खेचर' ह्यांना भेटायला सांगितले. हे तेच 'विसोबा खेचर' जे आधी 'ज्ञानेश्वर माऊलींचा' आणि त्यांच्या कुटुंबाचा खूप जीवघेणा मत्सर करत होते; पण 'ज्ञानेश्वरां महाराजंची.. पाठीवर मांडे भाजण्याची लिलया पाहून चकित झाले तेव्हाच तर त्यांचे परमभक्त झालेले.. त्यांनी 'संत नामदेवांना' शिष्य करून उपदेश केला आणि संतश्रेब्ठ 'नामदेवांचे' आत्मज्ञान पूर्ण केलं.
माणसाच्या आयुष्यात सर्वज्ञात असाच चांगल्या गुरूंची छाया कृपादृष्टी असेल तर योग्य तिच दिशा ते आपल्या शिष्यांगणाना दर्षवतो आणि जिवनाचे सार्थक घडवून आणतो..तोची परमार्थात तुडुंब न्हाहतो...
तोच विश्वाचा जादूगर च असतो ... !!

जय जय पांडुरंग हरी;
'संत नामदेव' महाराज'

आबा
Copyright Protected

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं