Follow Dream City, Poem: स्वप्नतल्या शहरात:
"स्वप्नतल्या शहरात"
The day itself was very heavy..I got a wonderful topic "Follow Dream City: Poem" and precious words came out from the pen; they started flowing like the wind. And a love poem full of beauty came from the heart...!
दिवसच खूप भारी होता..अप्रतिम विषय मिळाला आणि लेखणीतून सरसर करत लाखमोलाचेच शब्द बाहेर पडू लागले; जणू चेतक घोड्यासारखे सुसाट वाहू लागले. आणि सौंदर्याने तुडुंब भरलेलं प्रेमकाव्य समोर उभे राहिले…!
स्वप्नतल्या शहरात
स्वप्नतल्या शहरात अहो
स्वप्नतल्या शहरात
माणसाच्याच आयुष्यात
शेवटी असतं तरी काय हो
उराशी बाळगून असलेल्या
स्वप्नातच तो वावरतो असतो आणि
अंतहीन स्वप्ने पाहत तो स्वप्नांतच
ती स्वप्ने साकारत असतो.
स्वप्नात … काहीही असतं हो
त्या तर पर्वता एवढ्या
आशा-आकांक्षा मनात साठवत..
स्वप्नातही तो जणू काही
खरंखुरं आयुष्य तो जगत असतो.
स्वप्नात का होईना; पण कोणाला तरी
तो मनापासून साद घालत असतो.
मनात जपलेल्या प्रिय व्यक्तीला
आतल्या आत अंतःकरणापासून
ग्वाही देत, तो पुजतच असतो..
देव-देवतांच्या साक्षीने
मनापासून तो वरतो
आणि ते मात्र उगाचच
काहीही शंका मनात घेऊन
रूसल्या मनाने फुगूनच बसतं
तरीही बरं काऽ.. त्यांच्या सुखात
तो स्वत:ला पहात असतो..
स्वप्नतल्या शहरात
अहोऽ स्वप्नतल्याच शहरात
खरंखुरं प्रेम तो करतच असतो; पण
ते मात्र उगाचच शंका मनात घेऊन
रूसून बसलेलं असतं
आबा
Copyright Protected
In the dream city, in the course of a man's life, What if there exists, in the end, The continuous flow of dreams Where all aspirations come true? In this dream-like realm, Everything takes shape, Resembling the mountains that hold hope And desires close to heart, making it feel like Living a genuine life. In these dreams, One can be intimately connected to someone They cherish deeply within their heart, Faithfully worshipping them, Witnessed by the Gods and Goddesses. As my heart swells, I observe their joy, Still worrying about their true feelings In the dream city, where genuine love persists, Yet suspicion lingers.
Yet suspicion lingers.
आबा
Copyright Protected

Comments
Post a Comment
Comments write here