Sunrise of life - जीवनाचा सुर्योदय

Kavya Push

Sunrise of life

।। जीवनाचा सुर्योदय ।।

Do You Know? 

Who wakes up early in the morning when the darkness is over, the night is over and the sky is bright.After Suryanarayan arrives daily with tireless efforts for the welfare of the world. dispelling the darkness of the thoughts that have encumbered the entire world and re-energizing with the energy of enlightened good thoughts,

Sunrise of life - जीवनाचा सुर्योदय

काळोखी दाटली
सरता सरता निशा ही सरली
तव ही आकाशी आशा ही उजळली 
प्रभात समयी जागृत ही तर जाहली 
कालचक्र घेऊन हाती उधळीत रंग रंगी 
रंगची ते तर लाल केशरी पिवळी
मन मोहिनी ही भासली आशा नारंगी
मन मोहिनी ही आशा नारंगी

रूपं गोजीर सुवर्ण सुंदर रूपेरी
शिरेटोप ते माथी हेची तेजस्वी अंगी 
शर कवडसे अनेक ते तर कैक 
उधळीत क्षितीजा सहस्त्र किरणं
तेजो मनमीत हे तर याच आशेचे झोत

सरता सरता निशा ही प्रभात समयी 
निशाधीनी आशा ही तर जागृत जाहली
उजळीत जीवन ते तर तेजोमय आकाशी 
दैवत अमुचे नारायण येती
हे तर देवादी देव
सुर्य-नारायण येती.

संपूर्ण जगतात मळभलेल्या विचारांचा अंधकार संपवून पुन्हा नव्यानं प्रकाशमय सद्विचारांची उर्जा घेऊन, साक्षात सुर्यनारायण जगत् कल्याणासाठी रोजच अथक प्रयासने आगमन करतात आणि तेच निसंदेह जगताला संदेश देतात,  अंतरिक नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन, जीवनात प्रगतीचा नवीन मार्ग सतत अवलंब करा, नव जीवनात चैतन्य निर्माण करून नव्या उमेदीने जीवनाचा सुर्योदय तुम्ही ही करा.
.
आशा आकांशा ज्योत
सतत ठेवत ठेऊन
जीवनात तेजोमय उन्नती करा
प्रगतीचा मार्ग खडतर जरी असला
तरी रोजच नव्या उमेदीने अवलंब करा 
हेची संदेश देती सुर्यनारायण
आदित्य भास्कर
आबा
Copyright Protected

That is what it means:

Surya-narayan comes every day with tireless efforts for the welfare of the world by removing the darkness of thoughts in the entire world and connecting with the energy of enlightened good thoughts and undoubtedly gives a message to the world,
Abandon internal negative thoughts and walk on a new path of continuous progress in life, create vibrancy in new life and dawn life with new hope.

Comments

  1. अप्रतिम सुंदर कविता व मार्गदर्शन खुप छान आबा🙏

    ReplyDelete
  2. सुपर्ब रचना

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं