Pandharinath: How to describe Panduranga? पंढरीनाथ: पांडुरंगाचे काय वर्णन करावे


पंढरीनाथ

Pandharinath: 
How to describe Panduranga?
पांडुरंगाचे काय वर्णन करावे ? 
साक्षात विधाता सृष्टीचा, कारता करविता तो तर, बोलावे तेवढे  कमीच की  हो, जीवनात पंढरीनाथच्या दिव्या-नंदाच्या आगमनाने, जीवनातल्या पवित्रतेची अनुभुती अनुभवायला सुरूवात झाली. पंढरपूरातील प्रत्येक भक्ताच्या हृदयात पंढरीनाथच्या सानिध्याने आणि आनंदाने पाण्याच्या कावडीतून, दही दुधाच्या, लोण्यात गोड अमृताच्या धारा भक्तिरसाने प्रसादात मिळते.पंढरीनाथाच्या पद स्पर्शाने मनाला अद्वितीय शांतता आणि स्वर्गीय आनंद लाभते.अद्वितीय प्रेमाच्या प्रती सात्विक जीवनातल्या साक्षर होण्याचा  आशीर्वाद सदैव लाभते

पंढरीनाथ

आला हरी पंढरीनाथ
घेऊन कावड ... दही दुध लोणी
                   आला हरी पंढरीनाथ         || ध्रु |||

अमृत गोडी गोड रसाळ
नीर समान जीव मधाळ 
भौतिक सुख हे सार निराळ
जणींले....अमृतानुभव पंढरीनाथ

आला हरी पंढरीनाथ
घेऊन कावड ... दही दुध लोणी
                   आला हरी पंढरीनाथ         || ध्रु |||

राजस प्रेमळ.....सकल मनांचा 
केशरी कौस्तुभ....टिळा अभिरा चा  
मुख कमला ....कमल दलाचा
तेजपुंज पांडुरंग ...सकल जनांचा 

आला हरी पंढरीनाथ
घेऊन कावड ... दही दुध लोणी
                   आला हरी पंढरीनाथ         || ध्रु |||

कर ठेऊनी....कावडी...खांद्यावरी 
ध्यान सदा माऊली....तुजवरी
मुखी नाम....पांडुरंग हरी 
हेची जीवन सदा सत्वरी

आला हरी पंढरीनाथ
घेऊन कावड ... दही दुध लोणी
                   आला हरी पंढरीनाथ         || ध्रु |||
आबा
❤️
©
शनिवार १० जून २०२३ 

Comments

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं