That Day of the Full Moon: पोर्णिमेच्या त्या दिवशी
"पोर्णिमेच्या त्या दिवशी "
"That Day of the Full Moon"
This is a different poem presented to us. The beauty and significance of the full moon night is captured in a different and evocative manner. Some analysis reviews on the poem are given here.
"पोर्णिमेच्या त्या दिवशी "
ही एक वेगळी कविता आपल्या समोर सादर करण्यात अली आहे . पौर्णिमेच्या रात्रीचे सौंदर्य आणि महत्त्व ज्वलंत आणि उद्बोधक पद्धतीने टिपले आहे .कवितेवरील काही विश्लेषण समीक्षांनी येथे दिले आहे
प्रतिमा:
कविता प्रतिमेने समृद्ध आहे, पौर्णिमेची रात्र, तारे आणि आकाशीय सौंदर्य यांचे स्पष्ट चित्र रेखाटते. वर्णने वाचकाच्या संवेदनांना गुंतवून ठेवतात आणि एक संवेदनशिल अनुभव तयार करतात.
भावना विचारात घेतल्यास:
कविता आनंद आणि उत्सवाची भावना व्यक्त करते, जी पौर्णिमेच्या रात्रीसाठी योग्य आहे. या निमित्ताने आनंदाचे भाव आणि लोकांमधील एकतेची भावना उत्तम प्रकारे चित्रित केली आहे.
रचना विस्तार विचार केला असता:
कवितेला छान प्रवाह आहे, प्रत्येक कडवे सहजतेने पुढच्या कडव्यात मिसळला जातो. "चंद्र होता साक्षीदार" आणि "अगदी मौज मजा करत" या वाक्यांची पुनरावृत्ती कवितेला लयबद्ध दर्जा निर्माण होऊन जाते वाचताना आनंद मिळतो .
सांस्कृतिक संदर्भ विचार केला तर:
तुम्ही विविध नक्षत्र आणि खगोलीय घटकांचे संदर्भ यात सुरेख पद्धतीने समाविष्ट केले आहेत, जे कवितेमध्ये खोली आणि सांस्कृतिक महत्त्व जोडतात. हे वाचकाला खगोलीय घटनांच्या व्यापक संदर्भाशी मनोभावे जोडते.
यातून हाच संदेश दिला जातोय की:
कविता उत्सव, एकात्मता आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्याचा आनंद देणारा संदेश सर्व मनामनात देते असे दिसते. हे आपल्याला जीवनातील दडलेल्या साध्या आनंदाची आठवण करून देते आणि ते साजरे करण्यासाठी एकत्र येण्याचे महत्त्व पटवून देते. एकूणच, ही कविता पौर्णिमेच्या रात्रीचे सार प्रभावीपणे हृदयात पकडते आणि आश्चर्य आणि आनंदाची भावना व्यक्त करते. खूपच छान
"पोर्णिमेच्या त्या दिवशी "
काय झालं कुणास ठाऊक..!
त्याच त्या नभात एकाच आभाळात
सारे तिकडेच राहाणारे ... होते भ्रमण करत
चंद्र होता आणि असंख्य तारका ही तरंगत
एकाच अंतरिक्षात ... चम चम चमकत
सारेच होते लुकलुकणारे ... मनो वेधत
होते त्यात काही जण .... तेजस्वी लुकलुकत
आनंदात नाचणारे .. आपली परिक्रमा पूर्ण करत
होते सारे तेच .. आपले काम करणारे .. न चुकत
पण....चंद्र होता साक्षीदार ... त्यातच एक
ढगा मागून होता हसत... बदमाश तोच एक
रोजच आपली कला ... एकच एक वाढवत
सगळ्याहून वेगळ अस्तित्व तो आपलं दाखवत
त्यानंच तर मनोमनी आपल्या ... सार काही ठरवत
आमवस्या, पोर्णिमा, अष्टमी, चतुर्थी हे तर
त्यांच्याच पाचविला सटवाईनच पुजलेलं
पण एक मात्र खरं होत ... न चुकता ते ठरलेलं
काम आपल रोजच .... करतच ते राहिलेलं
पण ... काय होत कुणास ठाऊक..!
त्याच त्या नभात ... एकाच अंतरिक्षात
पौर्णिमा च होती त्या दिवशी...खूप खूप आनंदात
पोर्णिमेच्या दिवशी ... निरभ्र स्वच्छ आकाशी
मेळ घातला चांदण्यांनी .... हातात हात गुंफूनी
फेर धरला सर्वांनी .... लुकलूक्त्या चांदण्यांनी
होत्या आग्रणी भरणी, अश्विनी, कृत्तिका, मृगी
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्या, आश्लेषा, मघा, रोहिणी
होत्या त्याही, उत्तरा, चित्रा, स्वाती, हस्तीणी, फाल्गुनी
अनुराधा, ज्येष्ठा, मुळा, पूर्वाषाढा, वैशाखी
उत्तरा आषाढा, धनश्री धनिष्ठा, श्रवणी
होती ती ही तारका .... अगाऊ शताबदी
पूर्वा भाद्रपदा सह उत्तरा भाद्रपदा आणि
होती ती सुद्धा नक्षत्र रेवती...सौंदर्यवती उर्वशी
हसत खेळत फेर धरला ... त्याच सर्वांनी
स्वर्गातच जणू नव्या अंगणी
फेर धरला त्याच सर्वांनी .... म्हणूनच
तोच लाडका चंद्र होता आनंदात
त्याच त्या नभात एकाच आभाळात
सारे तिकडेच राहाणारे ... होते भ्रमण करत
चंद्र होता आणि असंख्य तारका ही तरंगत
एकाच अंतरिक्षात ... चम चम चमकत
सारेच होते लुकलुकणारे ... मनो वेधत
होते त्यात काही जण .... तेजस्वी लुकलुकत
आनंदात नाचणारे .. आपली परिक्रमा पूर्ण करत
होते सारे तेच .. आपले काम करणारे .. न चुकत
पण....चंद्र होता साक्षीदार ... त्यातच एक
ढगा मागून होता हसत... बदमाश तोच एक
रोजच आपली कला ... एकच एक वाढवत
सगळ्याहून वेगळ अस्तित्व तो आपलं दाखवत
त्यानंच तर मनोमनी आपल्या ... सार काही ठरवत
आमवस्या, पोर्णिमा, अष्टमी, चतुर्थी हे तर
त्यांच्याच पाचविला सटवाईनच पुजलेलं
पण एक मात्र खरं होत ... न चुकता ते ठरलेलं
काम आपल रोजच .... करतच ते राहिलेलं
पण ... काय होत कुणास ठाऊक..!
त्याच त्या नभात ... एकाच अंतरिक्षात
पौर्णिमा च होती त्या दिवशी...खूप खूप आनंदात
पोर्णिमेच्या दिवशी ... निरभ्र स्वच्छ आकाशी
मेळ घातला चांदण्यांनी .... हातात हात गुंफूनी
फेर धरला सर्वांनी .... लुकलूक्त्या चांदण्यांनी
होत्या आग्रणी भरणी, अश्विनी, कृत्तिका, मृगी
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्या, आश्लेषा, मघा, रोहिणी
होत्या त्याही, उत्तरा, चित्रा, स्वाती, हस्तीणी, फाल्गुनी
अनुराधा, ज्येष्ठा, मुळा, पूर्वाषाढा, वैशाखी
उत्तरा आषाढा, धनश्री धनिष्ठा, श्रवणी
होती ती ही तारका .... अगाऊ शताबदी
पूर्वा भाद्रपदा सह उत्तरा भाद्रपदा आणि
होती ती सुद्धा नक्षत्र रेवती...सौंदर्यवती उर्वशी
हसत खेळत फेर धरला ... त्याच सर्वांनी
स्वर्गातच जणू नव्या अंगणी
फेर धरला त्याच सर्वांनी .... म्हणूनच
तोच लाडका चंद्र होता आनंदात
अगदी लई खुशीत लई लई खुशीत
हळूच गालात हसत...तो सगळ्यांना होता शोधीत
आनंदाचा साक्षीदार...तोच मौज मजा करीत
सगळ्यांच्या बरोबर ... तोच होता मधोमध
अगदी मौज मजा करीत
अगदी मौज मजा करीत
आनंदाचा साक्षीदार...तोच मौज मजा करीत
सगळ्यांच्या बरोबर ... तोच होता मधोमध
अगदी मौज मजा करीत
अगदी मौज मजा करीत
आबा



खूपच सुंदर आबा पंढरीचे वर्णन
ReplyDelete