किती हे विचार आले
किती हे विचार आले
![]() |
| https://images.app.goo.gl/141GZ7RaMH9pf3tr5 |
किती हे विचार आले
मनात विचार खुप येतातच
आणि पाहुण्या सारखे निघुनही जातात
त्यात कहीअलिप्त राहायचा
उगाचच ते प्रयत्न करतात
पण काय करणार?
नाही बुवा जमले ... काही तेच मला
सतत तेच ते विचार .. घोंघावत राहातात मनात
मग मुख्य विषय तसेच .. पटकन बाजूला जातात
विषयच बाजूला गेले की .. भरपूर बोलणी
खावी लागतात.. मलाच
कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा त्यात
जीव ओतून सांगायला ही लागतात
अरेऽ... कसं सांगू तुला...सांग ना रे मला?
अलिप्त राहून कसं कळणार मला?
तुझ्या विना कसं जमणार मला?
आता गुड माॅर्निग झालं की नाही
ते सांगशील ना रे मला
इतकं अलिप्त राहून
काय मिळणार तुला सांगशिल का मला?
काय मिळालं तुला ?
"आबा "
Copyright protected

अतिशय सुंदर रचना केली आबा
ReplyDelete👌👌👌👌👌खूप छान.
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय सर👌👌👌👌
ReplyDeleteआबा, सुंदर शब्दांत काव्यविष्कार....!👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDelete