Lost in The Fog There Were Only a Few Dreams.-पहाटेचे स्वप्न आता
Lost in The Fog
There Were Only a Few Dreams.
धुक्यातला क्षण
विषय अगदी निराळाच हो
धुके हे विरत जावे
पहाटेचे स्वप्न आता तरी सरत जावे
असे हे म्हणतात; पण...मग तेव्हाच
धुक्यात हरवलेला तोच
रंगीबेरंगी श्रुंगारी क्षण
पुन्हा पुन्हा आठवत रहावे ..
त्याची लज्जत तर काही औरच असते
जरी सरलं ते पहाटेचे स्वप्न
तरी मन मात्र दिवसभर त्यातच रमतं
प्रत्त्येक क्षण जणू गुणगुणत सांगतच असतं
लव यू लव यू करत
पाखरा सारखं उडतच असतं
मग काय विचारता
अहो .. ऐकानाऽ
ते तर नुसते शब्द ऐकूनच
अगदी खूषच असतं
बाजूचे लव्ह बर्ड मात्र त्याच आनंदात
भिरभिर उडत मस्ती करत असतं
पहाटेच्या स्वप्नाचं गुपीत
ते आपल्यालाच सांगत असतं
आबा
Copyright © Protected

खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteव्वा आबा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteखूपचं भारी लिहिलयं
ReplyDeleteवाहा... भारीच की...आबा साहेब
ReplyDeleteखूपच छान ..👍👌✍️🍫🧁
ReplyDeleteमस्त मस्त रचना 👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम
ReplyDelete👌👌👌👌 खूप सुंदर रचना
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना...
ReplyDeleteअप्रतिम रचना .....👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌👌
ReplyDelete