Lost in The Fog There Were Only a Few Dreams.-पहाटेचे स्वप्न आता

Lost in The Fog 
There Were Only a Few Dreams.

Lost in the fog, there were only a few dreams. The fog dissipates but the remaining moments give energy to live.. Such a hazy dream...:
Lost in The Fog, There Were Only a Few Dreams

धुक्यात हरवलेला स्वप्नांचे काही निराळाच असत.धुके विरून जातात पण उरलेले क्षण मात्र जगण्याची उर्जा देत जातात..!
असेच एक धुक्यात विरलेल स्वप्न....:

धुक्यातला क्षण
विषय अगदी निराळाच हो
धुके हे विरत जावे
पहाटेचे स्वप्न आता तरी सरत जावे
असे हे म्हणतात; पण...मग तेव्हाच
धुक्यात हरवलेला तोच
रंगीबेरंगी श्रुंगारी क्षण
पुन्हा पुन्हा आठवत रहावे ..
त्याची लज्जत तर काही औरच असते
जरी सरलं ते पहाटेचे स्वप्न
तरी मन मात्र दिवसभर त्यातच रमतं
प्रत्त्येक क्षण जणू गुणगुणत सांगतच असतं
लव यू लव यू करत
पाखरा सारखं उडतच असतं
मग काय विचारता  
अहो .. ऐकानाऽ 
ते तर नुसते शब्द ऐकूनच
अगदी खूषच असतं 
बाजूचे लव्ह बर्ड मात्र त्याच आनंदात
भिरभिर उडत मस्ती करत असतं 
पहाटेच्या स्वप्नाचं गुपीत
ते आपल्यालाच सांगत असतं

आबा

Copyright © Protected




Comments

  1. व्वा आबा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  2. खूपचं भारी लिहिलयं

    ReplyDelete
  3. वाहा... भारीच की...आबा साहेब

    ReplyDelete
  4. खूपच छान ..👍👌✍️🍫🧁

    ReplyDelete
  5. मस्त मस्त रचना 👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम

    ReplyDelete
  6. 👌👌👌👌 खूप सुंदर रचना

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर रचना...

    ReplyDelete
  8. अप्रतिम रचना .....👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं