हिंदोळ्यावर चे स्वप्न:
हिंदोळ्यावर चे स्वप्न:
खूपच छान, सुंदर विषयावर लिहायचं अवसर आज खूप दिवसांनी मिळत आहे. प्रत्येक माणूस आयुष्यातील कितीतरी तास झोपेतच असतो.
आणि
| Sp.Thanks to https://bit.ly/3cEbQvk for this image |
झोप म्हणलं की स्वप्न ही आलीच
त्यात तो क्षणात फिरुनी ही येतो
स्वर्ग़ाहुन ही सुखद अनुभव तो घेतो
मनातल्या 'आशा-आकांक्षा' पूर्णत्वास ही नेतो
मनसोक्त आनंद तो तर लुटतच असतो
क्षणा क्षणाला मनसुबे रचत उधळत असतो
अद्वैत इच्छा त्याची सारी साकारतच असत़ो
चंद्रावर जायला, राणीच्या मिठीत तयारही असतो
तर क्षणात जगाचा तो, राजा झालेला असतो
तेव्हा च तर राणी त्याची, सर्वकाही असते
फॅशनच्या दुनियेत ती तर, विश्वसुंदरीच असते
कवडीच्या खिशाला जगी सर्व सुख ते
जणू पायाशी लोळण घेत, वाहातही असते
खरंच होऽ..परिसस्पर्श होऊन सारं मनाला भावते
आणि काय सांगू खरंच होऽ
खाडकन जागा होऊन, सारंच मातीमोल होते
तोच जीव जागेपणी
हेच तर शोध घेत, वणवण फिरत असते
त्याच्याच मागे मन हे
अहोऽ..धावतच असते
तेव्हाच तर मी राणीऽ
हिंदोळ्यावर स्वप्नात तुला
पहिलेले असते. पाहिलेले असते
आबा
<aaba>©</aaba>
Copyright Protected
खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम नेहमीप्रमाणे 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखुप छान लिहिलय आबा👍👍👍👍👍🙏
ReplyDeleteखूप सुंदर रचना ..👍👌✍️🍫
ReplyDeleteखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखूपच सुंदर आणि अप्रतिम लिहिलय आबा 👌👌👌👍👍👍✍️✍️✍️🙏🙏🙏🍫🍫🍫💐💐💐
ReplyDelete